loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी वकील संघटनेकडून ॲड. संग्राम देसाई यांचा सत्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) - माझ्या विरोधात अनेक षडयंत्र रचवण्यात आली. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एकीचे बळ दाखवले. त्यात करून सावंतवाडी वकील संघटनेची एकी आगळी वेगळी आहे सावंतवाडी मध्ये बाहेरची व्यक्ती येऊन माझ्या विरोधात वकिलाना भडकवत होती. पण सावंतवाडीतील सर्व वकील पुरेसे पडले. त्यांचे षडयंत्र सावंतवाडीतील वकिलानी हाणून पाडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मला सावंतवाडीतून मिळाली त्यामुळे मी सावंतवाडीच्या सर्व वकील बांधवांचा खरंच ऋणी आहे. अशीच एकीचे बळ कायम ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांच्या हिताच्या दृष्टीने मी काम करणार आहे, असे महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य ॲड संग्राम देसाई यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने शनिवारी सावंतवाडी वकील संघटनेच्या चेंबर मध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ॲड संग्राम देसाई यांचा शाल व श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक, अँड. दिलीप नार्वेकर, अँड. सुभाष पणदूरकर, तालुका अध्यक्ष बालाजी रणशूर व तालुका बारचे बहुतांश सदस्य उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg