loader
Breaking News
Breaking News
Foto

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश

सिंधुदुर्ग - शिष्यवृत्ती परीक्षा 2025- 26 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे शिष्यवृत्ती पटकावत उज्वल यशाची परंपरा कायम राखली. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) प्रशालेचे एकोणीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरी सर्वसाधारण गटातून यश सावंत याने तालुक्यातून बावीसवा व जिल्ह्यातून चौथीसवा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती संपादित केली. तर पूर्व माध्यमिक परीक्षेत (इयत्ता आठवी) प्रशालेचे बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरी सर्वसाधारण गटातून करिष्मा मांजरेकर हिने तालुक्यातून तिसरा व जिल्ह्यातून पाचवा क्रमांक पटकावला तसेच अथर्वी मांजरेकर हिने तालुक्यातून बारावा व जिल्ह्यातून चौथीसवा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती मिळवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर, सहाय्यक शिक्षिका प्रेरणा भोसले, फरजाना मुल्ला, योगेश चव्हाण, लविना आल्मेडा, साक्षी सावंत, गोविंद प्रभू, प्रणिता मयेकर या शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ.सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg