loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारीस प्रारंभ

रत्नागिरी, (वार्ताहर) : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग तिसर्‍या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारी’ या अनोख्या उपक्रमाला गुरूवारी पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल मंदिर येथून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. वारीत ३० हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला असून, भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत ही वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या सायकलवारीचे प्रस्थान श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे कोषाध्यक्ष प्रमोद रेडीज व कार्यवाह राजन फाळके, तसेच हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व झेंडा दाखवून करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अशोक मयेकर, उपाध्यक्ष आनंद मराठे, विजय पेडणेकर यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळींनी वारकर्‍यांना शुभेच्छा दिल्या. विठ्ठल नामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या गजरात सायकलवारीला उत्साहात प्रारंभ झाला. या वारीमध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष दर्शन जाधव, सचिव डॉ. नितीन सनगर, खजिनदार योगेश मोरे, कार्यकारिणी सदस्य तसेच विशाल भोसले, योगेश सामंत, प्रसाद देवस्थळी, प्रसाद खेडेकर, राकेश होरंबे, वरद चुनेकर, अमित पोटफोडे, गजानन भातडे, ज्ञानेश्वर पांडे, पूजा कोसुंबकर, विनायक पावसकर, अमित जोशी, मृणाल वाडेकर, ओंकार फडके, निलेश शाह, मंगेश शिंदे, नारायण पाटोळे, अक्षय पोटफोडे, राहुल भोसले, अथर्व शेंड्ये, संतोष तावडे, विनायक कुर्‍हाडे, विकास कांबळे, स्नेहल भिसे, किरण चुंबळकर, तेजस ढवळे आणि अ‍ॅड. सचिन नाचणकर सहभागी झाले आहेत.

टाईम्स स्पेशल

यंदाच्या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे क्लबमधील केवळ २० वर्षांचा सर्वात तरुण सदस्य तसेच ७४ वर्षीय ज्येष्ठ सायकलपटू यांचाही उत्साहपूर्ण सहभाग. वयाला न जुमानता श्रद्धा, जिद्द आणि फिटनेसचा आदर्श या माध्यमातून सर्वांसमोर ठेवण्यात आला आहे. सुमारे ३३० किलोमीटरचा हा प्रवास तीन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg