loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग - वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील २८ एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर एमआयडीसी स्थापन करण्याचा प्रस्ताव

रत्नागिरी टाइम्स डेस्क: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील २८ एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) स्थापन करण्याबाबत उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची विधानभवनातील त्यांच्या दालनात भेट घेऊन सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी निवेदन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन, कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात प्रगत असला तरी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अजूनही मोठी क्षमता आहे. नाधवडे परिसरातील उपलब्ध शासकीय जमीन, आवश्यक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील औद्योगिक विस्ताराची क्षमता लक्षात घेता येथे नवीन MIDC विकसित करणे गरजेचे आहे,असे मंत्री पालकमंत्री राणे यांनी म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

त्यामुळे, मौजे नाधवडे येथील शासकीय जागेवर MIDCची स्थापना झाल्यास सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठे प्रोत्साहन मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होईल आणि जिल्ह्यातील युवकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. तसेच सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg