loader
Breaking News
Breaking News
Foto

पैसाफंड मध्ये स्मरण चित्राचे प्रात्यक्षिक, युवा चित्रकार प्रज्वल घडशी याची उपस्थिती

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे शासकीय रेखाकला परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकरीता कला वर्गात युवा चित्रकार प्रज्वल घडशी याने स्मरण चित्राचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. युवा चित्रकार प्रज्वल घडशी सध्या सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे येथे रंग व रेखाकला द्वितीय वर्षात शिकत आहे. प्रज्वलला बालपणापासून कलेची आवड असल्याने त्याने आपला चित्रकलेचा छंद जोपासण्यावर अधिक भर दिला. शालेय स्तरावर त्याने चित्रकलेत राज्य स्तरावरील पारितोषिके प्राप्त केली आहेत. कलेची आवड असल्यामुळे प्रज्वलने सह्याद्री कला महाविद्यालयात उच्च कलाशिक्षण घ्यायचे ठरवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी परवानगी दिल्यानंतर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना रेखा कला परीक्षेचे मार्गदर्शन करण्याच्या हेतूने प्रज्वल घडशी याने पैसा फंड इंग्लिश स्कूल येथे आज स्मरण चित्राचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शासकीय रेखाकला परीक्षेत विद्यार्थ्यांना स्मरणचित्र हा विषय काहीसा कठीण जातो, यामुळे पैसा फंडच्या कला विभागातर्फे या दोन विषयांच्या सरावावर सर्वाधिक भर दिला जातो.

टाईम्स स्पेशल

कलावर्गात १ जुलै पासून रेखाकला परीक्षेसाठी जादा तास सुरु झाले आहेत. कला विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो यासाठी आज स्मरण चित्र विषयाचे प्रात्यक्षिक युवा चित्रकार प्रज्वल घडशी यांने करुन दाखविले आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. रेखाटन कसे करावे, ते करताना कोणती काळजी घ्यावी? जलरंगात काम करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रज्वल याने सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रशालेत येवून प्रात्यक्षिक दाखविल्याबद्दल प्रशालेच्या कला विभागातर्फे युवा चित्रकार प्रज्वल घडशी याचे आभार मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg