loader
Breaking News
Breaking News
Foto

‘किसान दिना’निमित्त ‘बँक ऑफ इंडिया’, दोडामार्ग शाखेतर्फे शेतकर्‍यांचा भव्य सत्कार

दोडामार्ग(प्रतिनिधी)- राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ इंडिया, शाखा दोडामार्ग, येथे शेतकर्‍यांचा विशेष सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देशाच्या प्रगतीचा कणा असलेल्या शेतकर्‍यांच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी बँकेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात परिसरातील प्रगतशील शेतकर्‍यांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सत्कारप्रसंगी बँक ऑफ इंडिया, दोडामार्ग शाखेचे कर्मचारी करणम नंदकिशोर, शुभम दीपक गावडे आणि सुचन वसंत कोरगावकर ( विकास सोसायटी दोडामार्ग अध्यक्ष ) यांनी उपस्थित मान्यवरांसमवेत शेतकर्‍यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी बोलताना बँकेच्या कर्मचार्‍यांनी सांगितले की, शेतकरी हा देशाचा आधार आहे. बँक ऑफ इंडिया शेतकर्‍यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सदैव प्रयत्नशील आहे. किसान क्रेडिट कार्ड, पीक विमा योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमात उपस्थित शेतकर्‍यांना बँकेच्या विविध शेती कर्ज योजना, डिजिटल व्यवहार आणि विमा संरक्षणाबत मार्गदर्शन करण्यात आले. बँकेच्या या उपक्रमाचे शेतकर्‍यांनी कौतुक केले. या सत्कार सोहळ्यास बँकेचे कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg