loader
Breaking News
Breaking News
Foto

रसिकांच्या मनावर अनभिषिक्त अधिराज्य गाजवणारे भजनी कलावंत, रंगकर्मी,दीपक पोंक्षे उर्फ भाऊ यांचे दुःखद निधन

मकरंद / संगमेश्वर:का तुम्हीच मजवर रुसल्यावरती... बोलू.. मी कोणाशी ...? देवा... बोला हो माझ्याशी... अस भगवंताला आळवत, रसिकांच्या मनावर अनभिषिक्त अधिराज्य गाजवणारे भजनी कलावंत, रंगकर्मी,दीपक पोंक्षे उर्फ भाऊ यांनी जीवनाच्या रंग मंचावरुन एक्झिट घेतली.दीपक कृष्णाजी पोंक्षे (आंबव पोंक्षे) यांनी,शुक्रवारी रात्री आरवली येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.ते ६७ वर्षांचे होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय डाक विभागातून तक्रार निवारण अधिकारी या पदावरुन त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.भजनात त्यांना विशेष रुची होती. नाटक, अभिनय, दिग्दर्शन, नेतृत्व अशा एक ना विविध आयमांमुळे त्याचा लोकसंग्रह असीमित होता. सहज, मिश्किल स्वभाव आणि कुणाशीही जुळवून घेण्याची कला यामुळे त्यांच्या मैत्रीत कधी वयाची अट नसे. भजनात किंवा सांगितिक अन्य कार्यक्रमांमध्ये दीपक पोंक्षे यांच्या गायनाने रसिक भारावून जायचे,गाण्यातील सहजता आणि आवाजातील गोडवा यामुळे त्याची वाहवा व्हायची.दीपक पोंक्षे यांनी स्वतः आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायणाच्या उत्सवा निमित्त होणाऱ्या नाटकात अनेकदा काम केले होते.अनेकवेळा पंचक्रोशी, जिल्ह्यात झालेल्या नाटकांना दिग्दर्शन देखील केले होते. सूर्यनारायण मंदिराच्या उत्सवात जिल्हा स्तरीय एकांकिका स्पर्धा झाल्या होत्या त्या आजही लोकांच्या स्मरणात आहेत.त्याच्या आयोजनात दीपक पोंक्षे यांचा सिंहाचा वाटा होता.श्री सूर्यनारायण मंदिरातील विविध वार्षिक उत्सवात ते हिरीरीने सहभागी होत असत.पोंक्षे कुटुंबियांच्या होणाऱ्या आरत्यांमध्ये ते रममाण व्हायचे.अनेक ठिकाणी भजन,गायन स्पर्धेचे परीक्षण करायला,परीक्षक म्हणून बोलावले जायचे.

टाइम्स स्पेशल

दीपक पोंक्षे हे काही महिन्यापूर्वी पर्यंत माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत होते.प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता.शिक्षण संस्था चालवाना त्यांच्या काळात शाळेचा शतक महोत्सव न भूतो न भविष्यती साजरा झाला.पुढे कनिष्ठ महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव दिमाखात साजरा झाला. तसेच अशोक काशिनाथ पोंक्षे कला दालनातर्फे शाळेत झालेल्या जिल्हा व राज्य स्तरीय निसर्ग चित्र कला स्पर्धेच्या आयोजनात ते अग्रेसर होते.शाळेतील कै.पांडुरंग सिताराम लघाटे संगीत कक्षामार्फत झालेल्या विविध जिल्हा स्तरीय सुगम संगीत स्पर्धा यशस्वी होण्यात त्यांचाआ सिंहाचा वाटा होता. शिक्षण संस्थेचा पारदर्शक कारभार करत, सुनियोजनाने कारभार चालवण्यात त्यांचा हातखंडा होता.शाळेतील एखादा उपक्रम किंवा जिल्हा,राज्य स्तरीय स्पर्धा पूर्ण होई पर्यंत त्यांचे नियोजन ,आढावा हे विशेष व उल्लेखनीय असे. कर्मचाऱ्यांना आपुलकीने वागणूक देऊन काम करून घेण्याची दीपक पोंक्षे यांची पद्धत अनुकरणीय होती. शाळेत आल्या गेल्या अभ्यागतांचा यथोचित आदरातिथ्य करणे हे त्यांचे वैशिष्टय पूर्ण होते.सेवानिवृत्ती नंतर च्या काळात शालेय गणवेशाचे बिल्ले,विविध शिक्के, बनवण्याचा व्यवसाय होता.यानिमित्त जिल्ह्यातील अनेक शाळांशी त्यांचा संपर्क येत असे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg