पनवेल : पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसला आहे. तालुक्यातील खानाव येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि खंदे समर्थक भाऊशेठ पाटील यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेतले आहे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा दिमाखदार पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाऊशेठ पाटील यांच्यासह भाजपमध्ये दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात अगत्याने स्वागत केले. भाऊशेठ पाटील यांनी जो विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तो विश्वास पक्षसंघटनेच्या माध्यमातून पूर्णपणे सार्थ ठरवला जाईल, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली. या पक्षप्रवेशामुळे खानाव परिसरासह संपूर्ण पनवेल तालुक्यात भाजपची ताकद आणखी मजबूत झाली आहे.
महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील कुटुंबीयांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी खानावचे माजी सरपंच दत्तात्रेय पाटील, माजी उपसरपंच ताईबाई पाटील, माजी ग्रामपंचात सदस्य जयश्री पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, जनार्दन पाटील, ॲड. दिनेश पाटील, प्रतीक्षा पाटील, विठ्ठल पाटील, वासुदेव पाटील, मारुती पाटील, पंडित पाटील, कुंडलिक पाटील, लता पाटील, मोहिनी पाटील, अस्मिता पाटील, प्रज्ञा पाटील, सुरेखा पाटील, रंजना पाटील, स्नेहा पाटील, अर्चना पाटील, वंदना पाटील, विद्या पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीयांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू असलेल्या धडाकेबाज विकासकामांच्या जोरावरच नागरिकांचा पक्षावरील आणि नेतृत्वावरील विश्वास अधिक घट्ट झाल्याचे सांगितले. विरोधकांकडून होणाऱ्या प्रत्येक टीकेला भाजपने नेहमीच भाषणाबाजीने नव्हे, तर थेट जमिनीवरील विकासकामांच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे, असे सांगत ही विकासकामांची मालिका यापुढेही अविरतपणे सुरूच राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम भस्मा, कमला देशेकर, निकिता खारकर, पंचायत समिती सदस्या अस्मिता पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, अतुल घरत, माजी सरपंच गणू मुंढे, एकनाथ फराड, शशिकांत दिसले, बळीराम भोईर, दीपकशेठ तवले, गणेश तातरे, सुनील फराड, समीर मुंढे, निलेश वारदे, दिलीप तवले, विलास भोपी, विजय मुंढे, सचिन दिसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.