खेड (प्रतिनिधी) - खेड येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. खेड नंबर १ शाळेत झालेल्या जनरल सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष राजेंद्र चांदीवडे होते.शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उतेकर यांनी सभेसाठी निरीक्षक म्हणून काम पाहिले. खेड तालुका शिक्षक संघाच्या तालुका नेतेपदी संतोष जाधव, अध्यक्षपदी एकनाथ पाटील, सचिवपदी संजय जाधव, कार्याध्यक्ष म्हणून अनिल साळुंखे तर कोषाध्यक्ष म्हणून मारुती पाटील तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून सागर धप्पाधुळे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले व मागील कार्यकारिणीमधील माजी अध्यक्ष राजेंद चांदीवडे, माजी कार्याध्यक्ष सुधाकर पाष्टे व माजी कोषाध्यक्ष मंगेश झावरे या माजी कार्यकारिणीला धन्यवाद देऊन अभिनंदन केले.
तसेच नूतन कार्यकारिणीस पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सभेसाठी तालुक्यातील शिक्षक संघाचे अशोक मगदुम, शिरीष भालेकर, कृष्णा गंभीरे, अरविंद भागणे, अण्णासाहेब पाटील, प्रमोद म्हादे, बाजीराव पाटील, विनायक पडवळ, संदीप घाणेकर, लक्ष्मण कोळी, विजय सकपाळ, रविंद्र पाबे, गणोजी माने, प्रवीण कांबळे, विनोद यादव, आशिष उतेकर, संदीप साबळे, सचिन गमरे, राहुल तुगावकर, दिनेश दळवी, हर्षल तळोकर, शैलेश बहुतुले, शरद कदम, सुभाष बारगुडे इत्यादी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. लवकरच शिक्षक संघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शिक्षक मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. असे नवनिर्वाचित कार्यकारिणीकडून जाहीर करण्यात आले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.