पनवेल - कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेची वर्षासहल पनवेलजवळील वाजापूर येथील पाटील फार्महाऊस येथे निसर्गरम्य वातावरणात उत्साहात संपन्न झाली. साहित्य, निसर्गाचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सहलीला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वर्षा सहलीला शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रीती महाजन, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव भरत पाटील, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, ज्येष्ठ साहित्यिक, कवी आदी सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्या डॉ. प्रीती महाजन यांनी आपल्या भाषणात, साहित्यप्रेमींच्या स्नेहबंधांना अधिक दृढ करणारी आणि निसर्गाच्या सानिध्यात साहित्यिक अभिव्यक्तीला नवी ऊर्जा देणारी ही वर्षासहल सर्वांच्या स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त केल्या तर भरत पाटील यांनी, या उपक्रमास शुभेच्छा देऊन निसर्गाच्या सानिध्यात होत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. शाखेच्या सदस्या चित्रलेखा जाधव यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहलीची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. त्यानंतर साहित्यिक व कवींचा परिचय, साहित्यविषयक संवाद, कवी संमेलन तसेच निसर्गभेट, गाणी अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
हिरवाईने नटलेला परिसर, वाहते पाणी, पावसाच्या सरी आणि आल्हाददायक वातावरणात कवींनी आपल्या कविता सादर करत वर्षासहलीचा मनमुराद आनंद लुटला. वर्षा सहलीनिमित्त एका साहित्यप्रेमीने, सदस्यास छत्रीची भेट दिली. या प्रसंगी सहभागी सदस्यांनी साहित्य, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण केले. दिवसभराच्या उपक्रमात स्वादिष्ट भोजन आणि गरमागरम भजी, चहाचा आस्वाद घेत सर्वांनी सहलीच्या आनंददायी आठवणी मनात साठवून या साहित्यिक उपक्रमाचे कौतुक केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.