loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगेवाडी, वायंगणतड व केर येथे भाजप बूथ अध्यक्षांची बैठक; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीवर भर

तिलारी (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाच्या वतीने घोटगेवाडी, वायंगणतड आणि केर येथील बूथ अध्यक्षांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासह बूथस्तरावरील कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पक्षाच्या धोरणांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आगामी निवडणुकांसाठी बूथनिहाय नियोजन, मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क, केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या भेटीदरम्यान पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, युवा कार्यकर्ते, पराशर सावंत, प्रीतम पोकळे, गणपत डिंगणेकर, लवू नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी बूथस्तरावर सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg