loader
Breaking News
Breaking News
Foto

१५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; असुर्डे ग्रुप ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मौजे असुर्डेच्या बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभारामुळे मनवेवाडी प्रभागातील शेकडो ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट ओढवले आहे. गेल्या ५ जुलै २०२६ पासून मानवेवाडी, गुरववाडी, पातडेवाडी तसेच कुल्येवाडी-लोहारवाडी येथील सुमारे २०० हून अधिक कुटुंबांचा नळपाणी पुरवठा पूर्णपणे बंद असून, गेल्या १५ दिवसांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे मोठे हाल होत असून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामपंचायतीकडून दोन्ही पाणीपुरवठा पंप नादुरुस्त झाल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी एकाच वेळी दोन्ही पंप बंद पडणे हे निष्काळजीपणा आणि देखभालीच्या अभावाचे द्योतक असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मुख्य पंप बंद पडल्यास तातडीने वापरता यावा म्हणून पर्यायी पंप खरेदी करण्यात आला होता. मात्र तोही वापरण्यायोग्य नसल्याने लाखो रुपयांच्या यंत्रणेची देखभाल नेमकी कोणी केली, असा सवाल ग्रामस्थ मंगेश पाताडे यांनी उपस्थित केला आहे. सलग पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने टँकरद्वारे किंवा अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली नसल्याने नागरिकांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत आहे.

टाईम्स स्पेशल

ऐन शेतीच्या हंगामात महिला डोक्यावर हंडे घेऊन पाण्याच्या शोधात भटकत आहेत, तर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही या संकटाचा मोठा फटका बसत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांची होत असलेली ही फरफट ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेचे विदारक चित्र असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दरम्यान, गावातील जलजीवन मिशनची कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने आणि नैसर्गिक जलस्रोतांवर परिणाम झाल्याने संपूर्ण परिसर नळपाणी योजनेवर अवलंबून आहे. मात्र योजना बंद पडल्यावर कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg