loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला मंडणगडस्थित बळीराज सेनेचा पाठिंबा; मंडणगड तहसीलदारांना दिले निवेदन

मंडणगड (प्रतिनिधी) : दिल्ली येथील जंतर मंतरवर देशातील शिक्षण व्यवस्था सुधारणे व NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनास बळीराज सेनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे मंडणगड स्थित बळीराज सेनेने निवेदन दिले. यावेळी बळीराज सेनेचे मंडणगड तालुकाध्यक्ष ज्ञानदेव खांबे, तालुका सचिव ॲड. सुमेश घागरुम, उपाध्यक्ष सुरज पाडावे तसेच युवक अध्यक्ष सुरज म्हाब्दी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवेदनात शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, न्याय्य आणि विद्यार्थीहिताची व्हावी, तसेच NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी शासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मंडणगडस्थित बळीराज सेनेचा नैतिक व वैचारिक पाठिंबा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg