loader
Breaking News
Breaking News
Foto

पालशेत येथे मनसेच्या वतीने पंढरपूरला पायी वारी करणाऱ्या भक्तांना पाण्याच्या बॉटलचे वाटप

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पालशेत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूरला पायी वारी करणाऱ्या भक्तांना पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. गेली अनेक वर्ष पालशेतमध्ये मनसेच्यावतीने आषाढी एकादशीला पायी वारी करणाऱ्या सर्व भक्तांना वारीसाठी उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात येते. याहीवर्षी मनसेचे उपतालुका अध्यक्ष प्रसाद विखारे यांच्या सहकार्यातून सर्व भक्तांना पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. मनसेच्या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपतालुका अध्यक्ष प्रसाद विखारे यांच्या हस्ते करण्यात आले. गुहागर तालुक्यातील तवसाळ, हेदवी, वेळणेश्वर, कोंडकारूळ, साखरी आगर, पालशेत येथील शेकडो विठ्ठल भक्त पंढरपूरला पायी वारी करत जात असतात. सदरची वारी पालशेत येथे आल्यानंतर सर्व श्री विठ्ठल भक्ताना पाणी बॉटल वाटप करण्यात आले. यावेळी पालशेत येथील मनसे सैनिक उपस्थित होते. मनसे उप तालुका अध्यक्ष प्रसाद विखारे हे अनेक वर्ष सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम या परिसरामध्ये राबवत असून त्यांच्यात सेवाभावी उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg