loader
Breaking News
Breaking News
Foto

तथागत नागरिक पतसंस्था अध्यक्षपदी ‘अरविंद वळंजु’ तर उपाध्यक्षपदी ‘सूर्यकांत कदम’

कणकवली(प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांच्या पहिल्याच तथागत नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडल्यानंतर कणकवली येथील पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणुकीही बिनविरोध पार पडली. त्यानुसार अध्यक्षपदी अरविंद वळंजु यांची तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्ह्यातील बौद्ध समाजाने एकत्र येत तथागत नागरिक पतसंस्था स्थापन करून त्यानुसार या पतसंस्थेची निवडणूक वर्षभरात घेण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही निवडणूक बिनविरोधात व्हावी असा ठराव गेल्या वर्षी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यानुसार संचालक मंडळाची निवड बिनविरोध नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीमध्ये सुहास कदम, मिलिंद जाधव, मिलिंद सर्पे, सूर्यकांत कदम, रमेश कदम, अरविंद वळंजु, मोहन जाधव, दिलीप जाधव, सुषमा हरकुलकर ,श्रद्धा कदम, सिद्धार्थ कदम या ११ संचालकांची बिनविरोध निवड पार पडली होती.

टाइम्स स्पेशल

यानुसार, सोमवार २० जुलै रोजी अध्यासी अधिकारी ‘अभिनय विचारे’ यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या कणकवली कार्यालयात सर्व संचालकांची सभा होऊन अध्यक्षपदी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजु व उपाध्यक्षपदी सूर्यकांत कदम यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अभिनय विचारे व सर्व संचालकाने ही प्रक्रिया बिनविरोधपणे शांततेने पार पडल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्व संचालकांचे आणि निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg