संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा एक अभूतपूर्व सोहळा संगमेश्वर तालुक्याने अनुभवला! जागतिक पातळीवर आपल्या निस्वार्थी समाजसेवेचा ठसा उमटवणाऱ्या लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या 'लायन्स क्लब संगमेश्वर' या शाखेचा सन २०२६-२७ या नूतन वर्षाचा भव्य पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. संगमेश्वर जवळील धामणी येथील प्रसिद्ध 'द ड्राईव्ह इन' येथे आयोजित करण्यात आलेला हा सोहळा केवळ अधिकारांच्या हस्तांतराचा नव्हता, तर तो सामाजिक क्रांतीचा एक नवा अध्याय ठरला. या दिमाखदार सोहळ्याचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे, रविकांत शिंदे यांना लायन्स क्लब संगमेश्वरचे अध्यक्षपद भूषविण्याची ऐतिहासिक तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. सन २००२ पासून म्हणजे तब्बल दोन दशकांहून अधिक काळ क्लबचे एकनिष्ठ, ऊर्जावान आणि सक्रिय सदस्य राहिलेले रविकांत शिंदे हे आता लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. एकाच नेतृत्वावर लागोपाठ दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा दाखवलेला हा विश्वास त्यांच्या अफाट लोकसंग्रहाची आणि कर्तृत्वाची साक्ष देणारा असून, त्यांच्या या विक्रमी निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे.
सोहळ्याच्या सुरुवातीला महेश उपळकर यांनी अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून लायन्स क्लबच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला आणि नूतन कार्यकारिणीचे स्वागत केले. नेहा संसारे यांनी उपस्थितांना भारावून टाकणारे मनोगत व्यक्त केले. त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रविकांत शिंदे, सचिव अमोल पाटणे आणि खजिनदार मनीष चोचे या तिन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांची सामाजिक कार्यातील वाटचाल, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या कुटुंबाचे सामाजिक कार्यातील योगदान यांचा अत्यंत आत्मीयतेने व विस्तृत परिचय करून दिला. त्यांच्या या ओघवत्या आणि आपुलकीच्या परिचयामुळे नूतन पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या कौटुंबिक आधाराचा गौरव झाला, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
त्यानंतर, या दिमाखदार सोहळ्यासाठी प्रमुख पदग्रहण अधिकारी म्हणून लाभलेले दापोलीचे माजी विभागीय अध्यक्ष आशिष मेहता यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि मार्गदर्शक भाषणातून नूतन कार्यकारिणीला पद व गोपनीयतेची शपथ दिली. सोहळ्याचे पदग्रहण अधिकारी आशिष मेहता यांनी आपल्या मनोगतात नूतन चमूला शुभेच्छा देताना लायन्स क्लब संगमेश्वरने आजवर केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला. "संस्थेचे कार्य निरंतर आणि प्रभावी ठेवण्यासाठी नूतन ऊर्जेची आणि सक्षम नेतृत्वाची गरज असते, रविकांत शिंदे यांच्या रूपाने ती ऊर्जा क्लबला लाभली असून आगामी वर्षात हे सेवाभावी कार्य अधिक गतीने आणि व्यापक स्वरूपात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.