loader
Breaking News
Breaking News
Foto

TET पेपर फुटी विरोधात युवासेनेचा एल्गार

वेळणेश्वर (उमेश शिंदे ) - आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 2 जुलै 2026 रोजी चिपळूण युवासेनेमार्फत प्रांत अधिकारी, चिपळूण व उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण यांना TET पेपर फुटी प्रकरणी निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करावी व परीक्षा पुन्हा पारदर्शक पद्धतीने घ्यावी, ही प्रमुख मागणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदन देताना प्रीतम नंदकुमार वंजारे युवासेना तालुकाप्रमुख, चिपळूण, सुप्रिया प्रीतम वंजारे पंचायत समिती सदस्, निशाताई भोबसकर-आयरे - युवती सेना उपजिल्हाधिकारी, प्रथमेश भोबसक युवासेना उपतालुकाप्रमुख, राहुल भोसले युवासेना विभाग प्रमुख, आशिष सुर्वे युवासेना उपतालुकाप्रमुख, श्रेया खेडेकर युवती सेना विभाग अधिकारी, तीर्था लाड युवती सेना उपतालुकाप्रमुख, रेहान रूमानी युवा सेना उपविभाग प्रमुख, वेदांत वनगे युवा सैनिक, सतीश वनगे युवा सैनिक, प्रणित कोंडविलकर युवा सैनिक तसेच यावेळी युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

युवासेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. दोषींना शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांना धडा शिकवू असेही यावेळी सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg