मालवण (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचे ज्ञान मिळावे, श्रमसंस्काराची जाणीव व्हावी तसेच शेतकरी आणि मातीशी असलेले नाते दृढ व्हावे या उद्देशाने "बांधावरची शिवार शाळा" हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. इयत्ता अकरावी व बारावी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्यक्ष भातशेतीचा अनुभव घेतला.
या उपक्रमासाठी कालावल येथील प्रगतशील शेतकरी उत्तम जगन्नाथ खांबल यांनी आपल्या शेतात भात लागवडीसाठी जागा उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांनी चिखलमय शेतात उतरून भात रोपांची लागवड केली. प्रत्यक्ष श्रम करताना विद्यार्थ्यांनी शेतीतील कष्ट, निसर्गाशी असलेले नाते आणि शेतकरी जीवन जवळून अनुभवले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. उपक्रमादरम्यान रानकवी ना. धों. महानोर आणि कवी विठ्ठल वाघ यांच्या "काळ्या मातीत तिफन चालते" या कवितांचे वाचन स्वरा आचरेकर आणि डॉ. दत्तात्रय जाधव यांनी केले. त्यानंतर डॉ. जाधव यांनी शेतीचे अर्थकारण, अन्नसुरक्षेमध्ये शेतकऱ्यांचे योगदान आणि समाजातील त्यांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावर अल्पोपहाराचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील जीवनानुभव मिळाला असून श्रमाचे महत्त्व आणि शेतीविषयी आदरभाव अधिक दृढ झाला. या उपक्रमात पारिपत्ये एम. व्ही., भावना मुणगेकर, डॉ. दत्तात्रय जाधव तसेच अन्य शिक्षक सहभागी झाले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश घुटुकडे, संस्थाचालक आणि स्थानिक शाळा समिती सदस्य यांचे उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. "बांधावरची शिवार शाळा" हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.