loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरोली मोरेवाडी जि.प. शाळेचा प्रणय कांबळे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिला, तर सात मुले गुणवत्ता यादीत

खेड (दिलीप देवळेकर) - नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये साखरोली मोरेवाडी शाळेचा प्रणय प्रशांत कांबळे याने जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीमध्ये तेरावा क्रमांक प्राप्त केला. राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेला रत्नागिरी जिल्ह्याचा तो एकमेव विद्यार्थी आहे. अत्यंत दुर्गम भागात असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेचे कौतुक होत आहे. या शाळेच्याच ईश्वरी सत्यवान मेटकर, स्वराज महेश मोरे, अनुश्री विलास पाचाडकर, विनय विनोद पाटील, ध्रुव उमेश मुकनाक, अर्णव मनेश तांबे या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवून ग्रामीण भागातील या शाळेचे नाव जिल्हास्तरावर चमकवले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक राजेश भागणे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक अनिल यादव, कृष्णा गंभीरे अमोल सकपाळ यांचा देखील या यशामध्ये वाटा आहे. साखरोली मोरेवाडी शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg