loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरोडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम

सावंतवाडी, (प्रतिनिधी) - गोगटे गुरुजी प्रतिष्ठान मार्फत विनय सौदागर करीत असलेले शैक्षणिक कार्य अत्यंत उपयुक्त असून भविष्यात अधिकाधिक मुले गुणवत्ता यादीत चमकतील, असे ह्रद्य मत उद्योजक रघुवीर मंत्री यांनी व्यक्त केले. शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयात ते बोलत होते. प्राची शंकर गवंडी आणि प्रांजल ज्ञानेश सावंत या शिष्यवृत्तीधारक दोन मुलींचा गुणगौरव कार्यक्रम ग्रंथालयात आयोजित केला होता. आजगाव येथील गोगटे गुरुजी प्रतिष्ठान मार्फत गेली पाच वर्षे शिष्यवृत्तीचे विनामूल्य मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. यावर्षी हे वर्ग शिरोडा येथील र.ग. खटखटे ग्रंथालयात आयोजित केले होते. यात सहभागी मुलांपैकी दोन मुले गुणवत्ता यादीत आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुणगौरव कार्यक्रमात व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, सचिव सचिन गावडे, कार्याध्यक्ष रघुवीर तथा भाई मंत्री, ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. श्रीराम दीक्षित आणि मार्गदर्शक विनय सौदागर उपस्थित होते. सचिन गावडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. नंतर मुलांना गौरविण्यात आले. शिष्यवृत्तीधारक प्राची गवंडी व प्रांजल सावंत यांना प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येकी रोख एक हजार रुपये, ८ पुस्तके, किशोर मासिकाचे वर्षभराचे सदस्यत्व देण्यात आले. तसेच खटखटे ग्रंथालयाचे विनामूल्य सदस्यत्व बहाल करण्यात आले. दानशूर व्यक्तिमत्व भाई मंत्री यांनी प्रथम क्रमांक प्राप्त प्राची गवंडी हिला रोख पाच हजार रुपये, तर द्वितीय क्रमांक प्राप्त प्रांजल सावंत हिला रोख तीन हजार रुपये बक्षीस देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी मान्यवरांनी, मुलांनी, पालक गवंडी व नेहा सावंत यानी मनोगत व्यक्त केले. शेवटी ग्रंथपाल प्राची पालयेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम दीक्षित यांनी केले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे दिलीप पांढरे, एकनाथ शेटकर, सरोज रेडकर, तसेच ज्ञानेश सावंत व नम्रता राय उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg