loader
Breaking News
Breaking News
Foto

आबलोली आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा, सरपंच वैष्णवी नेटके यांचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील आबलोली हे गाव आजू - बाजूच्या ५०- ६० गावातील लोकांचे बाजार रहाटाचे आणि औषध उपचारांचे केंद्रबिंदू असून निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्र अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली हे कार्यरत आहे. या आरोग्य केंद्रात आबलोली पंचक्रोशीतील ५० ते ६० गावातील लोक औषध उपचारासाठी येतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच येथे शासकीय कार्यालय, बँका, पावर हाऊस, हायस्कूल, कॉलेज आहे. त्यामुळे आबलोली गावात कामासाठी लोक येतात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे ओ. पी. डी. देखील जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली या आरोग्य केंद्राची नवीन सुसज्ज अशी इमारत बांधून पूर्ण झालेली आहे.

टाईम्स स्पेशल

तरी आपणास निवेदनाद्वारे नम्र विनंती आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली या आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच वैष्णवी वैभव नेटके यांनी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg