loader
Breaking News
Breaking News
Foto

मुलांना कागदी पिशव्या व लाखोटे बनविण्याचे प्रशिक्षण, शिवाजी वाचन मंदिराचा उपक्रम

मालवण (प्रतिनिधी) - जागतिक कागदी पिशव्या दिनानिमित्त मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरमध्ये मुलांना कागदी पिशव्या व लखोटे बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक चंद्रशेखर कोचरेकर यांनी कागदी पिशव्यांचे महत्त्व मुलांना पटवून सांगितले‌. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्लॅस्टिकच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि सहज विघटनशील असणाऱ्या पिशव्यांच्या वापराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्लास्टिकच्या पिशव्या नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात आणि त्यामुळे जमीन व समुद्राला मोठा धोका पोहोचतो, याउलट कागदी पिशव्या पुनर्वापर करण्यायोग्य आणि पर्यावरणाला अनुकूल असतात. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि प्लास्टिक कचरा वापर बंदी आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन खरेदीमध्ये कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे, असे यावेळी चंद्रशेखर कोचरेकर यांनी सांगितले. यावेळी मानसी दुधवडकर, साक्षी सावंत, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg