दापोली (प्रतिनिधी) : जालगाव येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या गव्हाणी घुबड जातीच्या पक्षावर दापोली वन विभागाने येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक औषधोपचार करण्याची प्राणी दया दाखवण्याचे काम केले. या त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगीरीचे पक्षी आणि प्राणी मित्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दापोली तालुक्यातील जालगाव येथील गोल्ड व्हॅली येथील बंद घराचे बालकणीचे ग्रीलमध्ये गव्हाणी घुबड ईस्टर्न बर्न आउल प्रजातीचे एक घुबड अडकलेले असलेल्याची माहिती राजेश रमेश झगडे यांनी वन विभागाला दिली असता दापोलीचे वनपाल रामदास खोत तसेच वनरक्षक विश्वंभर झाडे या वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी असलेले घुबड प्राणीमित्र किरण करमरकर यांचे मदतीने सुरक्षित ताब्यात घेऊन परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वन विभाग अधिकाऱ्यांनी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, दापोली येथे औषधोपचारासाठी आणले असता सहाय्यक आयुक्त डॉ. पुजा किशोर कांबळे, पशुसंवर्धन, दापोली यांनी सदरील घुबडावर यशस्वी उपचार करत मरणासन्न अवस्थेतून वाचविले.
वन विभागाने पशुंप्रती दया दाखवत त्यांनी एका गतप्राण झालेल्या पक्षाला जीवनदान देण्याची महत्वाची भूमिका बजावली. या त्यांच्या सजग आणि मौन जातीवरील प्रेमभावनेचे प्राणी मित्र तसेच पक्षी मित्रांनी कौतुक केले आहे. गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड हा जगातील सर्वात जास्त आढळप्रदेश असणारा पक्षी आहे. ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. याला मराठी मध्ये घो-घो पिंजरा, पांजरा, छोटे घुबड, कानेल, चहारा अशी अनेक नावे आहेत. गव्हाणी घुबड पक्षी हा साधारण ३६ सें. मी. आकाराचा असतो. पाठीकडून सोनेरी-बदामी आणि राखाडी रंगाचा त्यावर काळ्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला, पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात.
याचे डोके गोलसर आकाराचे, काहीसे माकडासारखे असते. चेहऱ्याचा रंग पांढरा-बदामी आणि चोच बाकदार असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. गव्हाणी घुबड संपूर्ण भारतभर तसेच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांसह जवळजवळ संपूर्ण जगभर आढळणारा पक्षी आहे. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. हे पक्षी एकट्याने किंवा जोडीने जुन्या इमारती, किल्ले, कडेकपारी, शेतीचे प्रदेश येथे राहणे पसंत करतात. या पक्ष्यांचा विणीचा निश्चित काळ नाही. जुन्या-पडक्या इमारतींच्या कोनाड्यात, झाडांच्या ढोलीत काड्या वापरून तयार केलेले घरटे जमिनीपासून उंच ठिकाणी असते. घरट्यांजवळ दिवसा सावली येऊ शकेल अशा ठिकाणी ते बांधलेले असते. एकच घरटे वर्षानुवर्षे वापरण्याची सवय या पक्ष्यांना असते. मादी एकावेळी पांढऱ्या रंगाची, गोलसर, ४ ते ७ अंडी देते. भारतीय संस्कृतीत हे अपशकुनी मानले गेले असले तरी इंग्लंडमध्ये मात्र गव्हाणी घुबड विद्वत्तेचे प्रतीक मानले गेले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.