loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, गुहागर तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय, गुहागर (मागील इमारत) येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान करा... जीवन वाचवा... हा संदेश देत युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, गुहागर तालुक्याच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमामुळे रक्तसाठा वाढण्यास मदत होणार असून, गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg