loader
Breaking News
Breaking News
Foto

आरवली जीवन शिक्षण शाळेत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

वेंगुर्ले - आरवली येथील जीवन शिक्षण शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांची वेंगुर्ले येथील आरबीएसके (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम) पथकाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आरबीएसके पथकातील डॉ. भगवान मुंडे तसेच त्यांचे सहकारी तनुश्री नाईक आणि संजना मोचेमाडकर यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर गरजेनुसार विद्यार्थ्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. शाळेच्या वतीने सविता सातपुते आणि प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी आरबीएसके पथकाचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी डॉ. भगवान मुंडे यांनी सांगितले की, नियमित आरोग्य तपासणीमुळे विद्यार्थ्यांमधील विविध आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होते. तपासणीदरम्यान एखाद्या विद्यार्थ्यामध्ये गंभीर आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला पुढील तपासणी व उपचारांसाठी शासनामार्फत मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच आवश्यकतेनुसार विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून संबंधित विद्यार्थ्यांवर पुढील तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आरोग्य तपासणी उपक्रमावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg