loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस , अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान

मुंबई: सागर गोवळे /प्रविण जाधव : आज सकाळी मुंबई आणि उपनगरात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूरच्या सुभाष नगर परिसरात एक जुने झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु झाड खाली उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळल्याने तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अचानक पावसाचा जोर वाढल्याने हे झाड कमकुवत होऊन थेट रस्त्यावर कोसळले. ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळी तिथे वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, झाडाखाली उभ्या असलेल्या तीन चारचाकी गाड्यांचे या अपघातात प्रचंड नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल (Fire Brigade) आणि महानगरपालिकेचे आपत्कालीन बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाद्वारे कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या परिसरात वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg