loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडच्या पूरग्रस्त भागाची रामदास कदम यांची पाहणी; ४८ तासांत पंचनामे पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश

खेड (दिलीप देवळेकर) - शिवसेना नेते रामदास कदम यांनी सोमवारी दुपारी खेड शहरातील पूरग्रस्त भागाला भेट देत व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्तांच्या अडचणी जाणून घेतल्या. खेड शहरात आलेल्या पुरामुळे व्यापारी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी ४८ तासांच्या आत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दूरध्वनीद्वारे प्रांताधिकारी वैशाली पाटील यांना दिले. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पूरानंतर शहरात स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कार्याचेही रामदास कदम यांनी कौतुक केले. या कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामाचा निश्चितच गौरव केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ चंद्रकांत कदम, शहराध्यक्ष कुंदन सातपुते, नगराध्यक्ष माधवी बुटाला, गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक संजय मोदी, स्वप्नील सैतवडेकर, संजना कुडाळकर, सुनील दरेकर, तौसिफ खोत, कौशल जाडकर यांच्यासह युवा सैनिक, शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg