loader
Breaking News
Breaking News
Foto

मुसळधार पावसाचा इशारा : मंडणगड–बाणकोट रस्त्यावर दरड कोसळली; वाहतूक बंद

खेड (दिलीप देवळेकर) - रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातील मंडणगड बाणकोट रोडवर दरड कोसळली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंडणगड–बाणकोट मार्गावर मोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणेकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तसेच घाटमार्गातून प्रवास करणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, हवामानाचा अंदाज व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg