दापोली (प्रतिनिधी) - दापोलीत महावितरणच्या नियोजनशून्य कारभारावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत 'जनतेचा अंत पाहू नका; तातडीने यंत्रणा रस्त्यावर उतरवा' अशी मागणी करत संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. रविवारी पडलेल्या दमदार पावसाने दापोली तालुक्यात अनेक भागांतील वीजपुरवठा मागील चार ते पाच दिवस खंडित झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर दापोली भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप करत, नागरिकांना वेठीस धरणाऱ्या कारभारावर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर तालुक्यातील विविध गावांमधील वीजपुरवठ्याच्या समस्या, वारंवार होणारे ट्रिपिंग, तक्रारींना विलंबाने मिळणारा प्रतिसाद, झाडांच्या फांद्या वेळेत न तोडणे आणि यंत्रणेच्या अपुऱ्या तयारीबाबत प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी भाजपाच्या दापोली तालुकाध्यक्ष जया साळवी, उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष आणि दापोली पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, शहर अध्यक्ष अतुल गोंदकर, भाजपा मीडिया सेल प्रमुख धीरज पटेल, प्रसाद मांडवकर, बापू लिंगावळे, माजी तालुका अध्यक्ष मकरंद म्हादलेकर, ओंकार जोशी यांच्यासह जवळपास २५ ते ३० गावांतून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष जया साळवी यांनी अशा आपत्तीच्या काळात इतर तालुक्यातून महावितरणचे कर्मचारी बोलावून मनुष्यबळ वाढवून प्राधान्याने दापोलीची कामे करून घ्यावीत अशा सूचना केल्या. तर पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते यांनी पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्यांना त्रासदायक ठरणारी झाडे तोडण्यासाठी महावितरणने मागवलेल्या निविदा या फारच कमी दराच्या असल्याने तालुक्यात कोणत्याच कंत्राटदाराने या निविदा भरलेल्या नसल्याच्या बाबीवर प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी उपस्थित भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फारच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. महावितरणने केवळ स्मार्ट मीटर बसवणे आणि अंडरग्राउंड केबलिंग याच कामांना प्राधान्य दिले असल्याची ओरड कार्यकर्ते करत होते. यावेळी कार्यकर्त्यांची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन महावितरण प्रशासनाने पोलिसांना बोलावून घेतले. मात्र, कार्यकर्त्यांनी पोलिसांना हस्तक्षेप करण्यास मज्जाव करत आक्रमकपणे प्रश्न विचारणे चालूच ठेवले.
जया साळवी यांनी केलेल्या सुचनेनुसार महावितरणच्या वरिष्ठ विभागाला फोन करून जादा मनुष्यबळ देण्याच्या विनंतीला महावितरण प्रशासनाने होकार दिला आहे. उद्या सायंकाळपर्यंत हे जादा मनुष्यबळ दापोलीत दाखल होईल. तेव्हा या कामांना अधिकची गती येईल. तत्पूर्वी तालुक्यातील सत्तर टक्के भागांत विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी, शिरवणे, दाभीळ,पांगारी, भोपण, पंधेरी अशी 6 गावे 5 दिवसापासून अंधारात आहेत. 3 लाईनमन यांना हाताशी घेवून ग्रामस्थांनी जंगलातून वाट काढीत पाच विद्युत खांब बसविले आहेत. फणसू सब टेशनचे उप अभियंता तेवरे यांनी गेल्या 6 दिवसात एकही फोन उचलला नाही किंवा अजिबात फिरकले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये mecb च्या कारभाराबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.