संगमेश्वर (प्रतिनिधी) - समाजातील गरजू, निराधार, अनाथ आणि वृद्ध व्यक्तींना मदतीचा हात देण्याच्या उदात्त हेतूने स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशन, मध्यविभाग फेपडे वाडी, मानसकोंड यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या "वस्त्रदान योजनेस" लायन्स क्लब संगमेश्वरने भरीव सहकार्य करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. लायन्स क्लब संगमेश्वरच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला क्लबचे सभासद, हितचिंतक आणि देणगीदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पदग्रहण कार्यक्रमास उपस्थित असलेले पदग्रहण अधिकारी माननीय mjf ला.आशिष मेहता दापोली आणि संगमेश्वर लायन्स क्लब चे संस्थापक अध्यक्ष व माजी प्रांतपाल mjf ला.उदय लोध यांनी लायन्स क्लब संगमेश्वर व स्नेहबंध फाउंडेशन च्या या लोकोपयोगी उपक्रमाची तोंड भरून स्तुती केली. यावेळी अनेकांनी स्वतःच्या घरातील सुस्थितीत असलेले तसेच नवीन कपडे, ब्लॅंकेट, चादरी, शर्ट, पॅन्ट, साड्या, ड्रेस तसेच इतर विविध प्रकारचे उपयोगी वस्त्र मोठ्या प्रमाणात स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशनकडे सुपूर्द केले. संकलित करण्यात आलेली ही सर्व वस्त्रे लवकरच माहेर अनाथ व वृद्धाश्रम तसेच गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मदतीचा आधार मिळणार आहे.
या प्रसंगी लायन्स क्लब संगमेश्वरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविकांत शिंदे, सचिव अमोल पाटणे, खजिनदार मनीष चोचे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सभासद, हितचिंतक आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी वस्त्रदानासारख्या सेवाभावी उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमात वस्त्रदान करून सामाजिक कार्याला हातभार लावणाऱ्या प्रमुख देणगीदारांमध्ये पिंट्याभाई सावंत, यशवंत सैतावडेकर, शंकर शेठ भिंगार्डे, विवेक शेरे, डॉ. अमोल भिंगार्डे, पंकज कोकाटे, महेश उपळकर, नेहा संसारे, जमूरत अलजी, मनीष चोचे, योगेश भिंगार्डे आणि अतुल भिंगार्डे यांचा समावेश होता. त्यांच्या योगदानामुळे या वस्त्रदान मोहिमेला मोठे बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशनच्या वतीने संस्थापक व कार्यवाह सचिव दिपक फेपडे, कार्यकारिणी सदस्य अशोक फेपडे, संतोष फेपडे, गंगाराम फेपडे तसेच शुभम फेपडे यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी बोलताना संस्थापक व कार्यवाह सचिव दिपक फेपडे यांनी सांगितले की, "लायन्स क्लब संगमेश्वरने दिलेले हे सहकार्य आमच्या सामाजिक उपक्रमांना अधिक बळ देणारे असून, भविष्यातही अशा माध्यमातून अधिकाधिक गरजूंना मदत करण्याचा आमचा संकल्प आहे. लायन्स क्लब ने केलेल्या सहकार्य मुळे समाजाप्रती काम करण्याची अधिक प्रेरणा मिळाली आहे असेही सांगितले." त्यांनी लायन्स क्लब संगमेश्वरचे सर्व पदाधिकारी, सभासद, हितचिंतक तसेच सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानत, समाजातील प्रत्येकाने आपल्या घरातील सुस्थितीतील व वापरण्यायोग्य कपडे दान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही केले. यावेळी लायन्स क्लब संगमेश्वरच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशनसोबत भविष्यातही वस्त्रदान, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण तसेच विविध सामाजिक उपक्रम संयुक्तपणे राबविण्याची ग्वाही दिली. समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी दोन्ही संस्था परस्पर सहकार्याने सातत्याने कार्यरत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे समाजातील दातृत्वाची भावना अधिक दृढ झाली असून, सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि माणुसकीचा संदेश सर्वदूर पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशन आणि लायन्स क्लब संगमेश्वर यांच्या संयुक्त प्रयत्नातून घडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.