खेड : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे व आरोग्य सभापती तौसीफ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ रक्तपेढी, वलावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात विक्रमी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या सेवेत मोलाचा सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिराची सुरुवात लायन्स क्लबचे सभासद लायन विनोद मोरे व लायन संदीप मोर यांनी स्वतः रक्तदान करून केली. तसेच लायन पंकज शहा यांच्या भगिनींनी पहिल्याच टप्प्यात उत्साहाने रक्तदान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खेड नगरपालिकेचे कर्मचारी, विविध क्षेत्रातील नागरिक तसेच युवक-युवतींनी मोठ्या संख्येने रक्तदान करत समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
शिबिराच्या समारोपावेळी लायन विवेक कदम व लायन माणिक लोहार यांनी रक्तदान करून या समाजोपयोगी उपक्रमाची सांगता केली. प्रत्येक रक्तदात्याला लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आली, तर श्री स्वामी समर्थ रक्तपेढी, वलावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या वतीने रक्तदानाचे प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाला खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, सर्व नगरसेवक तसेच अनेक मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांचे व आयोजकांचे कौतुक केले. या यशस्वी रक्तदान शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष लायन अविनाश दळवी, कार्यक्रम प्रमुख लायन महेंद्र शिरगावकर, सचिव लायन उत्तम कांबळे, लायन पंकज शहा, लायन मिलिंद तलाठी, लायन रोहन विचारे,लायन सुरेश चिकणे, लायन परेश चिखले, लायन डॉ. मरकड, आयपीडीजी लायन डॉ. विरेंद्र चिखले, लायन डॉ. विक्रांत पाटील, लायन विनोद मोरे, लायन संदीप मोरे, लायन विवेक कदम, लायन माणिक लोहार यांच्यासह सर्व लायन्स सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“रक्तदान करा… जीवनदान द्या!”या संदेशाला खऱ्या अर्थाने प्रतिसाद देत आयोजित करण्यात आलेले हे शिबिर समाजातील सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेप्रती असलेली निष्ठा अधोरेखित करणारे ठरले. *“सेवा हाच आमचा धर्म” या लायन्स क्लबच्या ब्रीदवाक्याला साजेसा हा उपक्रम खेड शहरासाठी अभिमानास्पद ठरला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.