मुंबई : विधान परिषद उपसभापती म्हणून सभागृहात समाजातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, गरीब अशा प्रत्येक शोषित घटकाला निश्चितपणे न्याय मिळवून दिला जाईल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहिर यांनी येथे आपल्या सत्कार प्रसंगी केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ, महाराष्ट्र इंटक आणि गिरणी कामगार संयुक्त लढा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, आज महात्मा गांधी सभागृहात आमदार, कामगारनेते सचिन आहिर यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी अभिनंदनीय निवड झाल्याबद्दल ऋद्य सत्कार करण्यात आला. गिरणी कामगारांच्या आग्रहास्तव हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी सचिन आहिर बोलत होते. सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात टीका टाळून कष्टक-यांच्या अन्याया विरूध्द शेवट पर्यंत लढत राहू,असेही सांगितले. प्रारंभी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. सचिनभाऊ अहिर यांनी संघर्ष, संयम आणि झोकुन देण्याच्या प्रवृत्तीतून कामगारांना न्याय्य हक्क मिळवून दिला आहे. या प्रसंगी विधान परिषद उपसभापतीपद मिळवून कामगार चळवळीला आज जे मानाचे स्थान मिळवून दिले आहे. त्याबद्दल कामगार नेते सचिन अहिर यांचा शाल, श्रीफल आणि सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
त्यावेळी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे नेते सर्वश्री रमाकांत बने, आनंद मोरे, ऍड.बबन मोरे, राजन लाड, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष संजय कदम,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण आदींनी आपल्या भाषणात सचिन आहिर यांनी अनेक लढ्यातून कामगारांना जो न्यायहक्क मिळवून दिला, त्याचे स्मरण केले. महाराष्ट्रातील जवळपास दीडशेपेक्षा अधिक उद्योगातील कामगारांना एकाच झेंड्याखाली एकत्र आणण्यात सचिन अहिर यांनी यश मिळवलं आहे. गेल्या पाच वर्षापेक्षा अधिक काळापासून बंद असलेल्या एनटीसी गिरण्यांमधील कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवित असतानाच, सचिन अहिर यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली रखडलेल्या गिरणी कामगार घराच्या प्रश्नाला वाचा फोडली आणि हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. या गोष्टींना कामगार नेत्यांनी आपल्या भाषणात, सचिनभाऊ यांच्या कार्याला उजाळा दिला.
माजी नगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे,एचएमएसचे प्रदेशाध्यक्ष निवृत्ती धुमाळ आणि अनेक संस्था आणि उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सचिन अहिर यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिरसेकर, सुनिल बोरकर, सुनिल अहिर, शिवाजी काळे, उत्तम गिते, विजय काळोखे, मिलिंद तांबडे, किशोर रहाटे, साई निकम तसेच गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचेनेते हेमंत गोसावी, राजेंद्र साळसकर, डॉक्टर संतोष सावंत, भाऊसाहेब आंग्रे, वैशाली गिरकर आदी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे मान्यवर नेते,तसेच सर्वश्रमिक संघाचे कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.