loader
Breaking News
Breaking News
Foto

माचाळ वर्षा पर्यटनस्थळी जाणार्‍या पर्यटकांच्या वाहनांची तपासणी मोहिम, २७ वाहनचालकांविरुद्ध कारवाई

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील उंच हवेशीर असणा-या आणि तालुक्यात प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ माचाळ येथे वर्षा पर्यटनस्थळी जाणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लांजा पोलिसांकडून वाहनांची तपासणी मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या एकूण २७ वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यातील माचाळ हे गाव उंचावर असुन थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असल्याने पर्यटनस्थळ मंजूर झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ पर्यटन स्थळाची सर्वत्र ओळख आहे. पावसाळ्यात या ठिकाणी वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी दूरवरून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. प्रत्येक आठवड्याच्या विकेंडला माचाळ पर्यटनस्थळी मोठी गर्दी होताना दिसून येते. त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हावी, अपघातांना प्रतिबंध व्हावा आणि पर्यटकांनी सुरक्षित प्रवास करावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशातून ही तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती लांजा पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

तसेच पर्यटकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच अतिवेगाने न जाता सुरक्षित वाहने चालवावीत, पर्यटन स्थळाचे पावित्र्य राखावे, असे आवाहनही पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg