loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या आकाशवाणी केंद्रावरती बाल जगत हा कार्यक्रम संपन्न होणार

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या 'बाल जगत' या कार्यक्रमात रविवारी, १२ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता भरतनाट्यमच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करणाऱ्या स्वरा आशिष मुसळे हिच्या भरतनाट्यम प्रवासाविषयी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत स्वराने भरतनाट्यमची आवड कशी निर्माण झाली, नृत्य शिक्षणाचा प्रवास, नियमित सरावाचे महत्त्व, विविध सादरीकरणांचे अनुभव तसेच शास्त्रीय नृत्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला कशी मदत होते, याविषयी मनमोकळा संवाद साधला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शास्त्रीय नृत्याची आवड असलेल्या बालमित्रांसह पालकांसाठीही हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत. हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या मध्यम लहरी ११४३ किलोहर्ट्झ, एफ. एम. १०१.५ मेगाहर्ट्झ, Newsonair या लाईव्ह मोबाईल अॅपवर तसेच YouTube – airratnagiri1248 आणि Facebook/Instagram – @airratnagiri वरही ऐकता येणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg