loader
Breaking News
Breaking News
Foto

आरंभ ट्रस्टतर्फे केंद्र शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - तालुक्यातील केंद्र शाळा कळंबस्ते, उमरे, भीमनगर, वाडावेसराड, कळंबस्ते क्रमांक १ आणि मळदेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. हा उपक्रम आरंभ ट्रस्ट, नवी मुंबईच्या शोभा मूर्ती यांच्या वतीने, J.P. Morgan Chase यांच्या सहकार्याने तसेच समत्व ट्रस्ट, ठाणे यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पाण्याची बाटली, डबा, लेखन पॅड, कंपास बॉक्स, पाऊच, पेन, पेन्सिल आदी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे किट वितरित करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या शिक्षणाला निश्चितच हातभार लागणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी समत्व ट्रस्ट, ठाणेचे अध्यक्ष संतोष कांबळे, उपाध्यक्ष रुपेश कांबळे, विश्वस्त नरेंद्र खानविलकर, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संदेश महाडिक, तसेच भीमनगर, वाडावेसराड, कळंबस्ते क्रमांक १ येथील मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आरंभ ट्रस्ट, J.P. Morgan Chase आणि समत्व ट्रस्ट यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg