loader
Breaking News
Breaking News
Foto

नाबार्डकडून राष्ट्रसमृद्धीची बीजे पेरण्याचे ऐतिहासिक कार्य: महेश टिळेकर यांचे प्रतिपादन

रत्नागिरी, (संतोष कांबळे) - कोणत्याही गाजावाजाशिवाय शांतपणे राष्ट्रनिर्मितीचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डने ४५ वर्षात प्रवेश केला असून गेल्या ४४ वर्षांत नाबार्डने केवळ वित्तपुरवठा करणारी संस्था म्हणून नव्हे, तर ग्रामीण भारताच्या सर्वांगीण परिवर्तनाचा एक प्रभावी शिल्पकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक महेश टिळेकर यांनी रत्नागिरी टाइम्सशी बोलताना केले. ते पुढे म्हणाले की, देशात महामार्ग, विमानतळ आणि औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पांना मोठी प्रसिद्धी मिळत असताना, नाबार्डने मात्र वित्तीय सहाय्य, संस्थात्मक बांधणी, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि समुदाय सक्षमीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भक्कम आणि अदृश्य पाया उभारण्याचे कार्य सातत्याने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

४५ व्या स्थापना दिन साजरा करणाऱ्या नाबार्डने भारताच्या आर्थिक स्थैर्य, अन्नसुरक्षा आणि सर्वसमावेशक विकासाची एक राष्ट्रीय चळवळ निर्माण केली आहे. सार्वजनिक चर्चेत तुलनेने अल्पप्रसिद्ध राहूनही, लाखो ग्रामीण नागरिकांच्या जीवनात इतका व्यापक आणि दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणणारी नाबार्डसारखी संस्था एकमेवाद्वितीय आहे, असेही महेश टिळेकर यांनी गौरवाने नमूद केले. नाबार्डची स्थापना अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून झाली. पारंपरिक विकास वित्तसंस्थांप्रमाणे केवळ कर्जपुरवठ्यावर भर न देता, कृषी व ग्रामीण विकासासाठीची सर्वोच्च (Apex) संस्था म्हणून नाबार्डची रचना करण्यात आली. वित्तपुरवठा, धोरणात्मक मार्गदर्शन, संस्थात्मक बळकटीकरण, क्षमता विकास आणि नवोपक्रम यांचा समन्वय साधणारी ही संकल्पना त्या काळासाठी अत्यंत दूरदर्शी होती असे महेश टिळेकर यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

ग्रामीण समृद्धी केवळ कर्ज उपलब्ध करून दिल्याने साध्य होत नाही, ही मूलभूत आर्थिक वस्तुस्थिती नाबार्डने सुरुवातीपासूनच ओळखली असे नमूद करताना महेश टिळेकर यांनी शेतकऱ्यांना कर्जाइतकेच सिंचन, गरज बाजारपेठे, रस्ते, गोदामे आवश्यक असतात; गुंतवणुकीपूर्वी सक्षम संस्था उभाराव्या लागतात आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यापूर्वी ज्ञान व कौशल्याची जोपासना करावी लागते आणि विशेष म्हणजे नाबार्डने हे सर्व केल्याचे त्यांनी नमूद केले. नाबार्डने सर्वसमावेशक दृष्टिकोनातून बँकांचे पुनर्वित्तीकरण, सहकारी संस्थांचे सबलीकरण, प्रादेशिक ग्रामीण बँकांना बळकटी, राज्य सरकारांच्या ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने केल्याचे सांगून नाबार्डमुळे ग्रामीण वित्तपुरवठ्याची संकल्पना केवळ कर्जवाटपापुरती मर्यादित न राहता ती व्यापक ग्रामीण विकासाच्या प्रभावी साधनामध्ये रूपांतरित झाल्याचे टिळेकर यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg