रत्नागिरी ( रत्नागिरी टाइम्स डेस्क): गेल्या दोन आकड्यांपासून मंदावलेला पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. गेल्या आठ दिवस शेतकरी भात लावणी मध्ये दंग आहे, खाडीपट्टी मध्ये भात लावणी उरकत आले असून वलाट पट्ट्यात नाचणी लावणी ला प्रारंभ झाला आहे. रविवारी पाऊस सुरू झाला आहे, हा पाऊस समाधानकारक बरसत असल्याने शेतीसाठी पोषक ठरणार आहे. आषाढी पर्यंत हा पाऊस असाच बरसत राहिला तर यंदा शेतीला सुदिन येतील, असे शेतकरी वर्गातून म्हटले जात आहे.
यंदा पावसाचा हंगाम प्रारंभ होण्यास वीस दिवस इतका अवधी लागला, त्यानंतर पाऊस जोरदार सुरू झाला. कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, अनेक ठिकाणी पाणी भरले. अनेक घाटामध्ये दरडी कोसळण्याचा प्रकार झाला. खेड तालुक्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली त्यात दोघांचा मृत्यू झाला. आता पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे, यंदाचा पाऊस सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पडत असल्याने जगबुडी नदीला पाणी आले आहे, नदीने इशारा पातळी ओलांडली असून खेड बाजारपेठेत नदी प्रवाहाचा संचार सुरू झाल्याचे आमच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे भरले असून अजून मुख्य धरणांचा ओसंडा सुरू झालेल्या नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुराची शक्यता कमी आहे. हवामान खात्याने 24 तासासाठी येलो अलर्ट कोकणासाठी जाहीर केला आहे त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.
सायंकाळ नंतर सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अल्हाददायक असे वातावरण निर्माण झाले आहे. बरसणाऱ्या पावसाने बेधुंद वातावरण निर्माण झाले आहे, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण शेतीसाठी आवश्यक असणारा पाऊस बरसू लागला आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.