खेड (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा २०२४ चा ’छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथील ज्योती रामदास कदम यांना जाहीर झाला आहे. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यांनी महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक तर कोकणात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ज्योती कदम यांनी शिरगाव येथे ’ज्योती निसर्ग बंधन वनराई’ या उपक्रमातून विविध प्रकारची फळझाडे, वनझाडे, दुर्मीळ औषधी वनस्पती तसेच स्थानिक प्रजातींची मिळून सुमारे ७० हजार वृक्षांची लागवड केली आहे.
वृक्षलागवडीनंतर त्यांच्या संगोपन, संवर्धन आणि जैवविविधतेच्या जतनावरही त्यांनी सातत्याने भर दिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे परिसरात समृद्ध वनराई निर्माण झाली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री असलेल्या ज्योती कदम या गेली अनेक वर्षे पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत राज्य शासनाने त्यांचा या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी गौरव केला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने सामाजिक वनीकरण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे मूल्यमापन करून पुरस्कार विजेत्यांची निवड केली.
या समितीत वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव, सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर तसेच मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगांवकर यांचा समावेश होता. या पुरस्कारामुळे मंडणगड, खेड, दापोली तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून, पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणार्या अनेकांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. ज्योती कदम यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्कारचे सन्मान मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.