loader
Breaking News
Breaking News
Foto

किरबेट केंद्रातील दोन विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत: एक विद्यार्थिनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालूक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा किरबेटच्या विद्यार्थिनींनी इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळा व परिसराचे नाव रोशन केले आहे. आरोही संदीप सुर्वे व निधी अभिषेक कनावजे यांची शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झाली असून जीविका नयन कनावजे ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा पाटील, वर्गशिक्षक ज्ञानेश्वर मगदूम, तसेच हर्षाराणी धसाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच केंद्रप्रमुख दिव्या भाटकर, विस्तार अधिकारी नाईक, गटशिक्षणाधिकारी परीट यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व प्रेरणा विद्यार्थ्यांच्या यशामध्ये महत्त्वाची ठरली. तसेच शाळा व्यवस्थापन समिती व माजी अध्यक्ष सचिन अंकुशराव आणि विद्यमान अध्यक्षा संगीता सुर्वे यांच्या प्रोत्साहनामुळे हे यश शक्य झाल्याची भावना शाळेने व्यक्त केली. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून किरबेटसारख्या छोट्याशा केंद्राने मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg