दोडामार्ग (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेने विशाल परब यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, वझरे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह शिक्षणासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे वेदिका परब यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकीय पक्ष नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारी संघटना आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपत अशा लोकहिताच्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य भविष्यातही सातत्याने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, मुख्याध्यापिका कल्पना उमर्ये, शिक्षक राजन कोरगावकर, संजना कोळेकर, प्रीतम गवस, समीर पर्येकर, पत्रकार शिरीष नाईक, महेश गवस, संजू उसपकर, सुहास दळवी, नाना देसाई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.