loader
Breaking News
Breaking News
Foto

उसप गावच्या ग्रामसभेत होऊ घातलेल्या खाण व कुञिम वाळू प्रकल्पास कडाडून विरोध, पंचवीस वर्षांत प्रथमच मोठया संख्येने उपस्थितीने ठराव पास

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - उसप गावातील ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता या ठिकाणी असलेली गायरान शेकडो एकर जमीन गोवा येथील उद्योजक यांच्या घशात घालण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू होत्या. या संदर्भात १५ जुलै रोजी पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकारी आले असता संतप्त ग्रामस्थांनी त्यांना परतावून लावले होते. या नंतर ग्रामसभेत तीव्र विरोध करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी उसप ग्रामपंचायतमध्ये आयोजित विषेश ग्रामसभेत जमलेल्या शेकडो ग्रामस्थांनी काळा दगड उत्खनन, कुञिम वाळू प्रकल्प गावातून हद्दपार झाला पाहिजे, यासाठी कडाडून विरोध ठराव मंजूर करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी उसप ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा पार पडली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, माजी सरपंच, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. सुरू झालेल्या ग्रामसभेत माजी सरपंच प्रकाश गवस, यांनी उसप गावातील गायरान जमीन आमच्या हक्काची आहे. या ठिकाणी काळा दगड उत्खनन किंवा कुञिम वाळू प्रकल्प उभे करण्याचा प्रशासनाच्या प्रकल्पाला गावाचा विरोध आहे, असा विरोधी प्रस्ताव मांडला. याला उसप गावातील सुरेश गवस यांनी अनुमोदन दिले.

टाईम्स स्पेशल

यावेळी लक्ष्मण नाईक, बाबू गवस, धनंजय गवस, तसेच उपस्थित महिला यांनी विविध मुद्दे उपस्थित करत हा प्रकल्प कशा प्रकारे घातक ठरू शकतो, हे मुद्दे ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांच्या समोर मांडले. जमलेल्या दिडशे पेक्षा जास्त ग्रामस्थांनी हात वर करून या प्रकल्पाला कडाडून विरोध केला व तसा ठराव बहुमताने पास केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg