loader
Breaking News
Breaking News
Foto

सातार्डा ग्रामपंचायतीतर्फे ५५० झाडांचे वाटप; 'हर घर पेड' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

​सातार्डा (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत सातार्डा ग्रामपंचायतीच्या वतीने "हर घर पेड" या संकल्पनेतून तब्बल ५५० झाडांचे वाटप करण्यात आले. या अभिनव उपक्रमाला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ​या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील एकल महिलांना झाडे देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि महिला सन्मान असा दुहेरी उद्देश या उपक्रमाच्या माध्यमातून साध्य करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी सातार्डा ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप प्रभू, उपसरपंच विशाखा पारिपत्ये, ग्रामपंचायत अधिकारी कुणाल मसके, सावंतवाडी पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, सावंतवाडी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी शारदा नाडेकर, कृषी विस्तार अधिकारी शुभदा कवीटकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, शर्मिला मांजरेकर, अर्चना धारगळकर आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg