सावंतवाडी: देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ज्याप्रमाणे मोठे प्रयत्न सुरू आहेत, त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दारू, ड्रग्स आणि मटका जुगार पूर्णपणे नष्ट करण्याचा आमचा निर्धार आहे. या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली असून, केवळ किरकोळ विक्री करणाऱ्यांवरच नाही, तर जिल्ह्यात या अवैध गोष्टी आणणाऱ्या आणि त्यांचा सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई केली जात आहे. नुकतेच एका मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्णपणे ड्रग्स आणि मटका जुगार मुक्त होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.
पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की, गुन्हा करणारा व्यक्ती कोणत्याही विचारसरणीचा असो, तो केवळ एक गुन्हेगार असतो. त्यामुळे अवैध धंदे, मटका, जुगार, गोवा बनावटीची दारू आणि बीफचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. कारवाई करताना संबंधित व्यक्तीचा पक्ष, झेंडा, जात किंवा धर्म अजिबात पाहिला जाणार नाही. अवैध धंदेमुक्त सिंधुदुर्ग करेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही आणि यासाठी कुठल्याही टोकाला जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या एका वर्षात गांजा ओढणाऱ्यांपासून ते थेट त्याची विक्री करणाऱ्यांपर्यंत अनेकांवर कडक कारवाई झाली असून, याचे सर्व धागेदोरे प्रशासनाकडे उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील विकास प्रकल्पांविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही अणूऊर्जा प्रकल्प होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प जिल्ह्यात आणला जाणार नाही, हीच सरकारची भूमिका आहे. मात्र, केवळ राणे द्वेषापोटी काही घटकांकडून होणारा विरोध हा जिल्ह्यातील तरुणांचे भविष्य अंधारात टाकणारा आहे. रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेल्या तरुणांना पुन्हा मातृभूमीत आणणे आवश्यक असून, देवगड आणि सिंधुदुर्गची प्रतिमा आंदोलनांमुळे खराब होऊ नये जेणेकरून गुंतवणूकदार येथे येण्यास सकारात्मक राहतील, असे आवाहन त्यांनी केले. देवगडमधील तरुण अत्यंत जागरूक असून, या जागरूक तरुणांच्या बळावरच विकास साधला जाईल आणि त्यांना स्थानिक पातळीवरच नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असा शब्दही ना. नितेश राणे यांनी शेवटी दिला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.