loader
Breaking News
Breaking News
Foto

पी.एम.श्री वेळणेश्वर नं. १ प्रशालेत आज साहित्यिकांचा प्रेरणादायी संवाद

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर तालुक्यातील एकमेव पी.एम.श्री मानांकन प्राप्त पी.एम.श्री वेळणेश्वर नं. १ प्रशालेत आज (गुरुवार, दि. १६ जुलै २०२६) सकाळी ११.०० वाजता पी.एम.श्री हरित शाळा उपक्रमांतर्गत 'प्रसिद्ध तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान (Expert Talk)' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'लेखक, कवी आपल्या भेटीला' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील लेखक, कवी व साहित्यिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची दुर्मीळ संधी मिळणार असून त्यांच्यात साहित्याची गोडी, वाचनाची आवड आणि सर्जनशील लेखनाची प्रेरणा जागविण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद व ज्ञानरश्मी वाचनालय, गुहागरचे अध्यक्ष तसेच इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात कविता समाविष्ट असलेले सुप्रसिद्ध कवी-साहित्यिक राजेंद्र आरेकर सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात प्रा. मनाली बावधनकर (सुप्रसिद्ध लेखिका, निवेदिका व कीर्तनकार), सोनाली घाडे (ग्रंथपाल, ज्ञानरश्मी वाचनालय, गुहागर), ज्ञानेश्वर झगडे (सुप्रसिद्ध कवी), ईश्वर हलगरे (सुप्रसिद्ध कवी), सुधाकर कांबळे (सेवानिवृत्त प्राचार्य) तसेच डॉ. मनोज पाटील (सुप्रसिद्ध लेखक व बालभारती सदस्य) हे विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधणार असून साहित्यनिर्मिती, वाचन संस्कृती, भाषा संवर्धन आणि सर्जनशील लेखनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांसह पालकांनीही या आगळ्यावेगळ्या साहित्यिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे, पदवीधर शिक्षक बिपिन विचारे, शैलजा साळे उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, उपशिक्षिका सुलक्षणा करडे-राशिनकर, भारती गोवेकर- वावरे, शिक्षण सेविका प्रियांका पवार, अंजूम शेख, तेजस्विनी जगताप, सहायक शिक्षिका आकांक्षा खरे, साक्षी खरे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर व सर्व सदस्यांनी तसेच माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष विश्वजीत जामसुतकर यांनी केले आहे. शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये साहित्य, वाचन आणि सर्जनशील विचारांची आवड निर्माण करणारा हा उपक्रम परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून या साहित्यिक मेळाव्याबाबत विद्यार्थी, पालक आणि साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg