साटेली भेडशी, (प्रतिनिधी) : तळकट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवरील फायबर पत्रे खराब झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आरोग्य केंद्राच्या आत गळत आहे. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरोग्य केंद्रातील विविध कक्षांमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याने कर्मचारी काम करताना तसेच रुग्ण उपचारासाठी व प्रतीक्षेत बसलेले असताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून आरोग्य केंद्राच्या छपराची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांच्या आत छपराची दुरुस्ती करून नागरिकांची समस्या दूर करावी, अन्यथा तळकट पंचक्रोशीतील ग्रामस्थ शासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता पंचायत समिती, दोडामार्ग येथे तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात पंचायत समिती, दोडामार्ग आणि जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय शांताराम देसाई (कोलझर) यांनी केली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.