loader
Breaking News
Breaking News
Foto

अतिवृष्टीमुळे म्हसळा तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान; सभापतींकडून पाहणी

म्हसळा - गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे म्हसळा तालुक्यातील काळसुरी व खरसई परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे सभापती बबन मनवे यांनी संबंधित भागाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची तसेच खारीच्या वधाच्या कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी खारीच्या वधाच्या कामामध्ये अनेक त्रुटी असल्याने पावसाचे पाणी योग्य प्रकारे न निघाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार केली. याची गंभीर दखल घेत सभापती बबन मनवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कामातील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, उपसभापती लहुशेठ म्हात्रे, गटविकास अधिकारी मंगेश साले, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय शिंदे, संजय शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी धनंजय चाटे, प्रदीप शिरतोडे, माजी उपसभापती संदीप चाचले, राजू घोसाळकर, संतोष नाक्ती, चंद्रकांत बेडेकर, महादेव नाक्ती, पांडुरंग खोत, नारायण कांबळे, कानू शीतकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. याच दौऱ्यादरम्यान मान्यवरांनी मेंदडी उर्दू (क्र. १९१) शाळेला भेट देऊन बी.एल.ओ. यांची भेट घेतली व एस.आय.आर. अभियानाच्या कामाची माहिती जाणून घेतली. संबंधित काम समाधानकारक असून ते प्रगतीपथावर असल्याचे सभापती बबन मनवे यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg