दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग येथील वसतिगृहानजीक गेल्या कित्येक वर्षांपासून दिमाखात उभ्या असलेल्या तसेच खेळाडू विद्यार्थी, प्रवाशांसाठी सावलीचा आधार तर वटपौर्णिमा दिवशी महिलांना वड पूजा करणे, तसेच सात फेरे घेण्यासाठी सोयीचे ठरलेल्या वडाच्या झाडाची भलीमोठी फांदी आज रविवारी दुपारी मोडून रस्त्यावर पडली. यामुळे दोडामार्ग ते आयी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बाजूला असलेल्या खेळाचे मैदान ते सातेरी मंदीर अशा पर्यायी मार्गामुळे शेकडो वाहन धारकांना दिलासा मिळाला, अन्यथा शेकडो वाहने अडकून पडली असती. झाड पडून देखील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कुणी फिरकले नाही. अखेर कसई दोडामार्ग नगरपंचायतीकडून झाडाची फांदी बाजूला करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
दोडामार्ग ते आयी मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता कडेला धोकादायक झाडे आहेत. धाटवाडीमध्ये चार झाडे धोकादायक आहेत वाकून खाली आली आहेत. पण संबंधित विभागाकडून अद्याप ती तोडलेली नाही. दुर्घटना घडली कि बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जागी होणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दोडामार्ग वसतिगृहानजीक भले मोठे वडाचे झाड होते. गेल्या वर्षी पण काही फांद्या तुटल्या होत्या तर काही वर अडकून होत्या. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या वडाच्या झाडाची मोठी फांदी अलगद रस्त्यावर पडली. फांदी पडण्यापूर्वी दिड मिनिटे अगोदर दोन लहान मुले पुढे गेली आणि फांदी पडली, थोडक्यात दोघे जण वाचले. वडाच्या झाडाची फांदी मोडून पडल्याबरोबर काही वीज वाहिन्या तुटून पडल्या वीज प्रवाह तातडीने बंद करण्यात आला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.