loader
Breaking News
Breaking News
Foto

कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात डॉक्टर्स व परिचारिका यांना झालेल्या शिवीगाळ व मारहाणीबाबत खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांनी केला निषेध

खेड (प्रतिनिधी) - नुकत्याच घडलेल्या एका घटनेत कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात ड्युटीवर असणान्या डॉक्टर्स, महिला डॉक्टर तसेच परिचारिका यांना स्थानिक नगरसेवक व त्यांचे गुंडप्रवृत्तीचे सहकारी यांनी अत्यंत असभ्य व अश्लील भाषेत अर्वाच्य शिवी गाळ करून मारहाण केली, तसेच धमकीही दिली. या घटनेचे व्हीडिओ सध्या सर्व सोशल मीडियावर दिसत आहेत. ही घटना अत्यंत निंदनीय व घृणास्पद आहे. आम्ही खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (KGPA) सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. दिवसरात्र 24 तास रात्री अपरात्री रुग्णसेवा करणार्‍या डॉक्टर व परिचारिका यांना अश्या पद्धतीची वागणूक देऊन त्यांच्यावर हल्ला करणारे गुंडप्रवृत्तीचे राजकारणी व त्यांचे साथीदार हे एकूणच समाजासाठी व विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी खूप मोठा धोका आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन राज्य शासनाने दोषी व्यक्तींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, आणि कोणत्याही राजकीय दबावास न जुमानता या समाजविघातक गुंडांना कठोर शिक्षा घ्यावी; तसेच रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स व परिचारिका यांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, अशी विनंती या निवेदन खेड पोलीस ठाणे, प्रांत अधिकारी खेडE तहसीलदार खेड यांना खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (KGPA) ता. खेड, जि. रत्नागिरी. यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ परेश मळणगांवकर, सचिव डॉ सिद्धेश चिखले, डॉ प्रसन्न बाळ, डॉ अजित भोसले, डॉ प्रवीण राठोड, डॉ अखिल पवार हे उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात डॉक्टर्स व परिचारिका यांना झालेल्या शिवीगाळ व मारहाणीबाबत निषेध नोंदविण्यासाठी आज KGPA तर्फे प्रांतधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक खेड यांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ परेश मळणगांवकर, सचिव डॉ सिद्धेश चिखले, डॉ प्रसन्न बाळ, डॉ अजित भोसले, डॉ प्रवीण राठोड, डॉ अखिल पवार हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg