loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा गुहागर मनसेकडून निषेध

वरवेली (वार्ताहर) - दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात विविध न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमार व दडपशाहीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने तहसीलदार, गुहागर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जखमी विद्यार्थ्यांना योग्य उपचार व नुकसानभरपाई द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रथमेश रायकर, शृंगारतळी शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर तसेच सांस्कृतिक विभाग राहुल जाधव, जेष्ठ शिवसैनिक प्रमोद शिर्के उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg