खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंचवली गावातील गोठळवाडी परिसरात जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी राज्यमंत्री कदम यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. जमिनीला पडलेल्या भेगांमुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ राबवाव्यात तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नागरिकांच्या अपेक्षेनुसार कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी योग्य जागा निश्चित करण्यात येईल. त्यासाठी शासनाच्या जागेबरोबरच आवश्यक असल्यास खाजगी जागेचे पर्याय विचारात घेतल्या जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. खेड तालुक्यात अलीकडील काळात भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. धोक्याचा इशारा मिळतात तात्काळ सुरक्षा स्थळे स्थलांतर करावे, असे आव्हान देखील त्यांनी केले. तसेच धोकादायक वाड्यावर त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तयार करण्यात येत असून या प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते संजय कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य मानसी जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, खेड पंचायत समिती सभापती डॉक्टर अफिया पालेकर, खेड प्रांत, खेड तहसीलदार, खेड BDO, स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलन अथवा इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि कोणतीही संशयास्पद अथवा धोकादायक परिस्थिती आढळल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी केले. दरम्यान, प्रशासनाकडून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थितीवर सतत निरीक्षण केले जात आहे. आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.